राजकारण

Political Crisis : उपाध्यक्षांकडून 16 जणांना नोटीस, आमदारकी धोक्यात?

Published by : Team Lokshahi

Maharashtra Political Crisis Updates: राज्यातील राजकारणात एककडे एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या असतांना शिवसेनेही कंबर कसली आहे. शिवसेने विधानसभा उपाध्यक्षांकडे 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर शनिवारी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्व 16 आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार या 16 आमदारांना यावर भूमिका मांडण्यास सांगितले आहे. त्यासाठी सोमवार, २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ दिली दिली आहे.

काय आहे नोटीस?

नोटीसीत म्हटले आहे की, तुमचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी अर्ज आला आहे. यावर लेखी म्हणणे मांडा. तसेच यासंदर्भातील कागदपत्रेही सादर करा. दिलेल्या मुदतीत कागदपत्रांसह भूमिका न मांडल्यास काहीही म्हणणं नाही, असं समजून निर्णय घेण्यात येईल.

कुणाची आमदारकी आहे धोक्यात?

१)एकनाथ शिंदे

२) अब्दुल सत्तार

३)भरत गोगावले

४) संदीप भामरे

५) महेश शिंदे

६) अनिल बाबर

७) बालाजी कल्याणकर

८) संजय शिरसाट

९) लता सोनावणे

१०) प्रकाश सुर्वे

११) यामिनी जाधव

१२) तानाजी सावंत

१३) रमेश बोरनारे

१४) चिमणराव पाटील

१५) संजय रायमूलकर

१६) बालाजी किणीकर

नोटीसीला उत्तर देऊ

ज्या नोटीसा दिल्या आहेत त्याला उत्तरं देऊ. खरंतर या नोटीशीला कायदेशीर आधारच नाही. असा कायदा ओढून ताणून लावणं ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही अतिरिक्त वेळ मागून घेऊ, त्यांनी किमान एक आठवड्याचा वेळ द्यायला हवा होता, असा खुलाशा एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू