राजकारण

अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा 'शरद' बहरला; भाजपचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिला होता. यावरुन बावनकुळेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनीही एक कविता ट्विट करत बावनकुळेंवर निशाणा साधला होता. याला महाराष्ट्र भाजपने ट्विटरवरुन कवितेतूनच प्रत्युत्तर दिले आहे.

काय आहे भाजपची कविता?

दहा कोटींची वांगी

उगवते माझ्या शेतात

कोणती ही मशागत?

चर्चा जनमाणसात

बारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला

'ते'रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला

अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा 'शरद' बहरला

आम्हा, बाप-लेकीला,

आस एक लावसाची

जमीन लाटून कष्टकऱ्यांची

माडी उभारू 'शरदचंद्रा'ची

राजकीय कारकिर्द 53 वर्षाची

हौस भारी बिरुदे मिरवण्याची

काय सांगू माझ्या पप्पांची महती,

जिथे तिथे फक्त खंजीरच खुपसती, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी कविता ट्विट केली होती. हेरंब कुलकर्णी यांची चला, आपण धाब्यावर जाऊ, या कवितेतून सुळेंनी बावनकुळेंवर निशाणा साधला होता.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

वरळीत आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्या शायना एन.सी यांचं आव्हान?

SSC - HSC Exam Time table : दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाने दिली 'ही' महत्वाची माहिती

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचं थैमान; कांदा पिकाला मोठा फटका