विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मराठा आरक्षणाचा मुद्दा, आरोग्य विभागातील कथित घोटाळा, ड्रग्जच्या कारवाया, अशा अनेक मुद्द्यांवरुन या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
आजपासून पुढचे 10 दिवस नागपूरात हे हिवाळी अधिवेशन सुरु असणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. काल चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार टाकला.
यावर पत्रकार परिषदेतून विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. असे म्हणत फडणवीसांनी जोरदार टोला लगावला. त्यामुळे आता विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधारी कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय घेतला जाणार का? किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.