Maharashtra Assembly session Team Lokshahi
राजकारण

Maharashtra Assembly session : विधीमंडळाचे आजपासून दोन दिवसांचं अधिवेशन; सरकारची अग्निपरीक्षा

आजपासून दोन दिवस शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारवरील विश्वास सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या अधिवेशनात रविवारी आणि सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.

Published by : shamal ghanekar

राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. तसेच आजपासून दोन दिवस शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारवरील विश्वास सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या अधिवेशनात रविवारी आणि सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटात व्हिपवरुन जुंपण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे सर्व आमदार काल गोव्याहून मुंबईत दाखल झाले असून ते हॉटेल ताज प्रेसिडेन्सीत शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांची एकत्रित बैठक झाली. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबत त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नसल्याने शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये राजन साळवी यांच्या नावावर व्हिप बजावला आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरवण्यात आला नव्हता. त्यानंतर तिन्ही पक्षातील नेत्यांनी चर्चा केली आणि राजन साळवीच्या नावावर व्हिप बजावला आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार असून त्याच्या आधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news