राजकारण

महाविकास आघाडी सरकार परत सत्तेत येणार; रुपाली ठोंबरे पाटलांचे शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर

शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई 'त्या' वक्तव्याला यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बारामती : राष्ट्रवादी सत्तेपासून जास्त काळ लांब राहू शकत नाही आणि यामुळे त्यांची अगापाखड होत आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीला पुढील १५ वर्ष सत्तेत येवू देणार नाही, असे विधान शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी केले होते. याला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ईडी सरकार हे दबाव यंत्रणा वापरून आलेले आहे. दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार परत सत्तेत येणार, असे त्यांनी म्हंटले आहे.

रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, शंभुराज देसाईंनी 25 वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये. मुळात आत्ताच शिंदे फडणवीस ईडी सरकार हे छळकपट, हिटलरशाही, दबाव यंत्रणा वापरून आलेले आहे. दोन महिन्यात बघा काय परिस्थिती होते. हे सरकार परत उलटणार आहे आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार आहे.

आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्या एवढं सोप्प नाहीये. फक्त अजित पवार व उद्धव ठाकरे यांनी ते चांगल्या पद्धतीने सिद्ध करून दाखवलं होतं. महाराष्ट्राचे राज्य सांभाळून ते एकनाथ शिंदे यांना जमणार नाही. सध्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आपल्याकडे केलेले पण थोड्या दिवसात त्यांची नाराजी आपल्याला दिसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने शेतकऱ्यांना मदत करून शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. ईडी सरकारचे कुठेही लक्ष नाहीये. आमदार फोडणे, एकमेकांकडे बघणे, एकमेकांच्या कुरगुडी काढणे, दबाव तंत्र वापरणे, जे बोलणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवणे एवढेच काम आहे. पण, मी घाबरत नाही म्हणून समोर डायरेक्ट बोलते. मी जाताना 100 तरी घेऊन जाईल एवढा नक्कीच निश्चय केलेला आणि आई जगदंबेच्या चरणी तशी शपथ घेतलेली आहे. दरम्यान, ईडी सरकारने त्वरित शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे, अशी मागणीही ठोंबरे-पाटलांनी केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result