राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे बहुमताने विजयी झाल्या आहेत. राजस्थानच्या 199 जागांसाठी 1800 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. दर पाच वर्षाने राजस्थानमध्ये सत्ता पालट होत असल्याचा इतिहास आहे. राजस्थानमध्ये भाजप 113 जागांवर आघाडी घेतली आहे.
विजयानंतर वसुंधरा राजे म्हणाल्या की, राजस्थानचा हा गौरवशाली विजय पंतप्रधान मोदींचा विजय आहे. ज्यांचा मंत्र होता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. त्यांनी दिलेल्या हमीचा हा विजय आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचा हा विजय आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा हा विजय आहे. हा विजय जनतेचा आहे ज्यांनी काँग्रेसला नाकारले आणि भाजपला स्वीकारले, असे त्यांनी म्हंटले.
दिया कुमारी 50 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. राजस्थानच्या विद्याधर नगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार दिया कुमारी ५० हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी हे केसीआर यांच्याविरोधात लढत आहेत. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी हे कामारेड्डीमध्ये 2,585 मतांनी आघाडीवर आहेत.
पहिला निकाल मध्य प्रदेशातून समोर आला आहे. येथे कालापेपल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार घनश्याम चंद्रवंशी विजयी झाले आहेत. त्यांनी कुणाल चौधरीचा पराभव केला आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, राजस्थानमध्ये भाजपला 113 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. काँग्रेसला ७१, अपक्ष ७, बसपा ३, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष २, भारत आदिवासी पक्ष २ आणि आरएलडी १ जागेवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्याचे दिसले आहे. चारपैकी तीन राज्यात भाजप आघाडीवर आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर, तेलंगणात कॉंग्रेस आघाडीवर आहे.
तेलंगणामधील पहिला निकाल हाती समोर आला आहे. कॉंग्रेसचे आदिनारायण हे विजयी झाले आहेत. अश्वरा पेट या मतदार संघातून ते विजयी झाले आहे.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. तीन राज्यात भाजप आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन करण्यात आला आहे. तर, पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.
तीन राज्याच्या निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सेलिब्रेशन केलं आहे. पुण्यात पेढे वाटून आनंद साजरा केला.
भारतीय जनता पक्षाने आता छत्तीसगडमध्येही बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 40 जागांवर, बसपा 0 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत काँग्रेस आघाडीवर होती. आता तेथे भाजपने बहुमताचा आकडा (46) ओलांडला आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह म्हणाले, मी आधीच म्हणत होतो की, एक्झिट पोलच्या ट्रेंडमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत दडलेले आहे जे आज अंधेरा छटेगा,सूरज निकलेगा, कमल खिलेगा. कमळ फुलणार हेही घडले आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमताचा कल आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
छत्तीसगडमध्ये भाजप-कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे. कलांनुसार कॉंग्रेस सुरुवातीला आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर भाजपने धोबीपछाड देत आघाडी घेतली होती. आता पुन्हा एका जागेने कॉंग्रेस-भाजपमध्ये लढत होताना दिसत आहे. भाजप ४५ जागांवर तर काँग्रेस ४४ जागांवर आघाडीवर आहे.
तेलंगणातील 119 जागांवर कल समोर आला आहे. काँग्रेस 64 जागांवर, बीआरएस 43 जागांवर, भाजप 8 जागांवर तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
हैदराबाद, तेलंगणातील ताजकृष्णा बाहेर अनेक लक्झरी बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत. याबाबत प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरण कुमार चामला म्हणाले की, केसीआर यांची काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यांचा मुख्य अजेंडा इतर पक्षांच्या आमदारांवर लक्ष ठेवणे हा आहे. यादृष्टीने आम्ही काही उपाय केले होते, परंतु आजचे ट्रेंड आणि इतर गोष्टी पाहिल्यावर असे वाटते की त्याची गरज नाही. आम्ही 80 पेक्षा जास्त जागा जिंकत आहोत.
राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपने इथं मोठी आघाडी घेतली असून बहुमताचा आकडा गाठला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपला जनेतेचा कौल मिळताना दिसत आहे. छत्तीसगडमध्येही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसची पिछेहाट झाली आहे.
छत्तीसगड ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 38 आणि इतर 2 जागांवर पुढे आहे. 119 पैकी 60 जागा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहेत.
मध्य प्रदेशातील कलांनुसार भाजपला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. भाजपला 160 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 67 आणि इतरांना 3 जागांवर आघाडी मिळाली आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ छिंदवाडा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर बुधनी मतदारसंघातून शिवराज सिंह चौहान आघाडीवर आहेत. नरेंद्र सिंह तोमर दिमानी जागेवरून, नरोत्तम मिश्रा दतिया जागेवरून आणि कैलाश विजयवर्गीय इंदूर जागेवरून आघाडीवर आहेत.
तेलंगणामध्ये 51 जागांसह काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर भाजप केवळ 6 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी बीआरएसला 29 जागा आहेत. तर के. चंद्रशेखर राव कामारेड्डी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
अशातच, आम्ही जिंकणार, आम्ही तेलंगणा जिंकत आहोत. जय तेलंगणा. जय काँग्रेस. जय सोनियाम्मा, अशी पोस्ट काँग्रेस तेलंगणाने ट्विटरवर केली आहे. तर, तेलंगणातील काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे.
राजस्थानमध्ये भाजप मोठी आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये भाजप 130 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर 12 जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, भाजप राजस्थानमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होईल. जादूगराची जादू संपली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तेलंगणात काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस 65, बीआरएस 38, भाजप 9, एआयएमआयएम 3, इतर 1 जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. भाजप 151 जागांवर तर काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे. यादरम्यान, भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राजस्थान भाजपचे प्रमुख सीपी जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्ही आघाडी कायम ठेवणार आहोत. आम्ही 135 जागांवर विजयी होऊ. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला राजस्थानमध्ये बहुमत मिळताना दिसत आहे,.
छत्तीसगडमध्ये मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. कॉंग्रेस 54 जागांवर तर भाजप 35 जागांनी आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशातील सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. भाजप 130 जागांवर पुढे आहे. काँग्रेसला 96 आणि इतरांना 4 जागा मिळताना दिसत आहेत. अशातच, भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. आमच्या डबल इंजिन सरकारच्या लोककल्याणकारी योजना पाहता लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील. मला विश्वास आहे की त्यांचे आशीर्वाद भाजपवर असतील आणि आम्ही ते करू. पूर्ण बहुमताने सरकार बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसने मोठी आगाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार, काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 31 जागांवर आघाडी घेतली आहे.
राजस्थानात भाजपने शतक पार केलं आहे. राजस्थानात एकूण 199 जागांसाठी मतदान झालं आहे. राजस्थानात भाजप 105, काँग्रेस 80 आणि इतर 14 जागांवर आघाडीवर आहेत. तर, टोंक मतदारसंघातून कॉंग्रेसचे सचिन पायलट पिछाडीवर आले आहेत. आणि झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे (भाजप) पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप 120 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष दोन जागांवर दिसत आहेत.
तेलंगणामध्ये कॉंग्रेसने बहुमताचा आकडा पार करत 60 जागांवर आघाडी घेतली आहे. बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 4 जागांवर पुढे आहे. 7 जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत. दरम्यान, रेवंथ रेड्डींच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची गर्दी केली आहे.
मतमोजणी सुरू असताना छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आणखी एक टर्म मिळण्याची आशा आहे. अशातच, रायपूरमधील काँग्रेस कार्यालयातील बॅनर है तैयार हम असे बॅनर लागले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील 71 जागांवर कल समोर आला आहे. येथे काँग्रेस 46 जागांवर तर भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थानच्या सरदारपुरा मतदारसंघातून अशोक गेहलोत एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. राजस्थानच्या १९९ जागांवर कल दिसून आला आहे. येथे भाजप 101 जागांवर तर काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे. तर इतरांना 18 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.
तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये कॉंटे कि टक्कर सुरु आहे. तर राजस्थानात भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.
राजस्थानमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. राजस्थानमध्ये भाजप 100 जागांवर तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमधील 71 जागांवर कल समोर आला आहे. येथे काँग्रेस 46 जागांवर तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सध्याच्या कलानुसार दोन्ही पक्षांना समसमान 73-73 जागांवर आघाडी मिळाली आहे.
तेलंगणाततील 103 जागांसाठी ट्रेंड समोर आला आहे. तेलंगणात काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. येथे काँग्रेस 60 जागांवर आघाडीवर आहे. बीआरएसला ३३ तर एआयएमआयएमला ६ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसून येत आहे. छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागा असून यातील काँग्रेसला ३६ तर भाजपला ३२ जागांवर आघाडीवर आहे.
तेलंगणातील 87 जागांवर कल समोर आला आहे. येथे केसीआर यांचा पक्ष बीआरएस ३० जागांवर, काँग्रेस ५०, भाजप २ आणि एआयएमआयएम ५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेस आता आघाडीवर आहे. भाजप 30 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 35 जागांनी आघाडीवर आहे. आतापर्यंत एकूण 65 जागांचे कल समोर आले आहेत.
राजस्थानमधील 109 जागांवर कल दिसून आला आहे. येथे भाजप 53 जागांवरून आघाडी घेताना दिसत आहे. त्याचवेळी काँग्रेस 50 जागांवर तर इतर 14 जागांवर आघाडीवर आहेत. तर, टोंक मतदारसंघातून कॉंग्रेसचे सचिन पायलट आणि झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे (भाजप) आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशातील 101 जागांवर कल दिसून आला आहे. येथे भाजप ५० जागांवर तर काँग्रेस ४९ जागांवर पुढे आहे. तर इतर 2 जागांवर पुढे आहेत. छिंदवाडामधून कमलनाथ आघाडीवर आहे.
तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीचे कल हाती येत आहेत. यादरम्यान काँग्रेसचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात आम्हाला ७० हून अधिक जागा मिळतील. एक्झिट पोल देखील तेच दाखवतात, असे त्यांनी म्हंटले आहे.
राजस्थानमध्ये 89 जागांवर कल दिसून आला आहे. भाजप 47, काँग्रेस 36 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानच्या टोंक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सचिन पायलट आघाडीवर आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मी हे आधीही बोललो होतो आणि आजही सांगतो की 130 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. बाकीचे बघायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याबद्दल ते म्हणाले, फक्त त्यांचा निरोप निश्चित नाही तर त्यांचा 'अच्छे दिन' देखील येथे संपतो, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.
राजस्थानमध्ये भाजप 36 जागांवर तर काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेशात भाजप ४५ जागांवर तर काँग्रेस ३९ जागांवर आघाडीवर आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस ८ जागांवर आणि भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात बीआरएस २ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर पुढे आहे.
राज्यमंत्री आणि भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी आम्ही राज्यात 125-150 जागा जिंकू. राज्यात भाजप सरकार स्थापन करेल. आता काही तासांची गोष्ट आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस 5 आणि भाजप 4 जागांवर पुढे आहे. राजस्थानमध्ये भाजप 3 आणि काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे. तेलंगणामध्ये BRS पुढे आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 2 आणि भाजप 1 जागेवर पुढे आहे.
निकाला आधी रिसॅार्टचे राजकारण सुरु झाले आहे. भाजप आणि काँग्रेस दोनही पक्षातील नेते सक्रीय झाले आहेत. आमदार फोडू नये म्हणून काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला सोमवारी दुपारी जयपुरला पोहोचण्याच्या सूचना पक्षांकडून देण्यात आल्या आहेत.
तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चारही राज्यांमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरूवात झाली आहे. टपाली मतांची मोजणी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती येईल.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. एकूण 90 जागांसाठी येथं काँग्रेस आणि भाजप या दोन मातब्बर पक्षांमध्ये लढत आहे. स्थानिक शेतकरी बघेल यांच्यावर खूश असल्याचं माय एक्सिस पोलच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
: तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं. 2 वेळा संधी दिल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोलवरून दिसतं. बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसत आहेत. त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होणार हे नक्की.
मध्य प्रदेशमध्ये निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 2018 मध्ये मतदारांनी कॉंग्रेसला 114 जागांचा कौल दिला होता. तरीही भाजपनं मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन कमळ राबवून कमलनाथांचं सरकार पाडलं होतं. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनीही भाजपची वाट धरल्यानं भाजपची ताकद मध्यप्रदेशमध्ये वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. कार्यालयाबाहेर काँग्रेस उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
राजस्थानची निवडणूक ही मुख्यत्वे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. यावेळी राजस्थान काँग्रेसला थोडं कठीण असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात उभे असलेले बंडखोर आणि सचिन पायलट यांच्या नाराजीची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018
पक्षाचे निकाल (230/230)
भाजप 127
काँग्रेस 96
बसपा 2
अपक्ष 4
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018
पक्षाचे निकाल (90/90) मतांचा वाटा
काँग्रेस - 68 43.0%
भाजप - 15 33.0%
JCC - 5 7.6%
बसपा - 2 3.9%
NOTA - 2.0%
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018
पक्षाचे निकाल (119/119) मतांचा वाटा
TRS 88 46.87%
काँग्रेस 21 32.80%
भाजप 1 6.98%
AIMIM 8 2.71%
इतर पक्ष 1 6.30%
अपक्ष 1 3.25%
NOTA - 1.09%
राजस्थान विधानसभा निवडणूक 2018
पक्षाचे निकाल (119/119) मतांचा वाटा
काँग्रेस 100 39.3%
भाजप 73 38.77%
अपक्ष 13 9.47%
बसपा 6 4.03%
RLP 3 2.40%
CPI(M) 2 1.22%
BTP 2 0.72%
RLD 1 0.33%
NOTA - 1.31%
राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या निवडणुकींचा निकाल आज जाहीर होणार आहे. या चारही राज्यांच्या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. त्यातच या राज्यांच्या निकाल येण्याआधीच काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यात आले आहे.