राजकारण

Lok sabha Election : राज्यात भाजपा लोकसभेच्या 30 जागा लढवणार?

राज्यात भाजप लोकसभेच्या 30 जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात भाजप लोकसभेच्या 30 जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील घवघवीत यशानंतर राज्यात भाजपने 48 पैकी 30 जागा लढवणे योग्य ठरेल, असा अहवाल सर्वेक्षण संस्थांनी दिला आहे.

यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, कोल्हापूर आणि औरंगाबाद मतदारसंघात भाजपने लढणे श्रेयस्कर ठरेल असा अहवाल सर्वेक्षण संस्थांनी दिल्याची माहिती मिळत आहे. आदिवासी भागातील पालघर आणि ठाणे, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, कोल्हापूर आणि औरंगाबाद हे आधी युतीत भाजपकडे नसलेले मतदारसंघ भाजपने लढणे श्रेयस्कर ठरेल, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणुकांची सेमिफायनल जिंकल्यानंतर आता भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. नाशिक विभागात सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या मतदारसंघाचा समावेश आहे. तीन राज्यांत विजय मिळाल्यानंतर आता भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी