आज महायुतीची जाहीरसभा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेमोदींच्या रोड शोनंतर महायुतीच्या मुंबईच्या प्रचाराचा हा एक प्रकारे ग्रँड फिनालेच असणार आहे. या महायुतीच्या सभेत महायुती महाशक्तीप्रदर्शन करणार आहे. ही सभा विक्रमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार असून ते काय घोषणा करतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल केलेले आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
लोकसभा निवडणुकीचा महराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार उद्या म्हणजेच 18 मे रोजी संपणार आहे. मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 जागांवर 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे प्रथमच राजकीय व्यासपीठावर एकत्र येत आहेत. त्यामुळे या सभेत दोघे काय बोलणार? महाविकास आघाडीवर या दोन तोफा कशा धडाडणार याचे औत्सुक्य जनतेत आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.