राजकारण

Laxman Hake : ओबीसी समाज 'तुतारी'ला मतदान करणार नाही

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून विधानसभा निवडणूक जाहीर होताच लक्ष्मण हाके यांची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लक्ष्मण हाके म्हणाले की, शरद पवारांना महाराष्ट्राने खूपवेळा साथ दिली. अनेकवेळा मुख्यमंत्री केलं पण शरद पवारांनी कुटुंबाच्या पलिकडे या महाराष्ट्रामध्ये कुणाला संधी दिली नाही. कुटुंबाच्या पलिकडे कुणाला कारखाने दिले नाहीत, विधानसभेची तिकीट दिलेली नाहीत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्ही ओबीसी बांधव शरद पवारांना आणि तुतारीला बॉयकॉट करत आहोत. कुणाला मत द्यायचं नाही हे ठरवलं आहे तर, आम्ही तुतारीला मत द्यायचं असं ठरवलं आहे. कारण त्याचे कारण असं आहे की, आमच्या हिताची भाषा कधी शरदचंद्रजी पवार कधी बोलले नाहीत आणि जरांगेसारख्या माणसाला ते सतत पाठिंबा देत आलेत. असे लक्ष्मण हाके म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी