लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.
लोकशाही संवाद या कार्यक्रमात मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत मुलाखत झाली. अयोध्यामध्ये लोढा यांनी घेतली जमीन? असे त्यांना विचारल्यावर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मला माहित नाही आहे कोणी काय आरोप केले तुम्ही त्यांचं नाव सांगा त्यांना सांगा एकही कागदपत्र त्याबद्दल असेल तर तुमच्याकडे द्यावा माझा राजीनामा घ्यावा. त्यांच्याकडे काही विषय नाही आहे. मी 35 वर्षांपासून बिझनेसमध्ये आहे. मी एकही सरकारची जमीन घेतली नाही म्हणून मी 6 मे ला लोकांसमोर उभे राहू शकतो. पण त्याचही राजकारण जे करतात त्यांना करु द्यावं.
काल विरोधी पक्षाचे अध्यक्षा ते मलबार हिलमध्ये गेले आणि त्यांनी सांगितले की मंदिर सगळे तुटलेले आहे. त्यांनी आतमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्ही पोलीसमध्ये तक्रार करा एकही मंदिर तुटलं आहे का? आता इलेक्शन आलं की त्यांच्या मनामध्ये नवीन नवीन विषय आहे आता काय करायचं आहे. प्रत्येक विषयाचा जवाब देत बसायचं का? असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.