शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पीएमसी बँक (PMC Bank Scam) घोटाळ्यातील आरोपी वाधवान हा किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या मुलाच्या कंपनीत संचालक असल्याचा आरोप केला होता. तसेच पीएमसी बँक (pmc bank) घोटाळ्यातील पैसा नील सोमय्या यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचेही राऊत यांनी म्हटले होते.
संजय राऊत (sanjay raut) यांनी या प्रकरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि आर्थिक गुन्हे शाखेकडेही सोपवली होती. याच प्रकरणात आता नील सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नील सोमय्या (Neel Somayya) यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आजच प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता न्यायालय नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणार का, हे पाहावे लागेल. संजय राऊत यांनी शिवसेना भवनातील पत्रकारपरिषदेत "बाप बेटे जेल जाएंगे", असा इशारा दिला होता.