Kirit Somaiya | Aditya Thackeray  team lokshahi
राजकारण

किरीट सोमय्यांनी केला आदित्य ठाकरेंवर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Published by : Shubham Tate

Kirit Somaiya Aditya Thackeray : काल राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. अधिवेशात अभुतपूर्व गोंधळ घडल्यानंतर आज भाजप पुन्हा शिवसेने विरोधात आक्रमक झालेले दिसून आले. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईतील मढ स्टुडिओची पाहणी केली. पाहणीनंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. (Kirit Somaiya accused Aditya Thackeray of corruption of thousand crores)

नियमात बसत नसताना देखील आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी मुंबईचे पालकमंत्री असताना या स्टुडिओच्या बांधकामाला परवानगी दिली आणि त्यातून स्टुडिओचं व्हॅल्युएशन असलेल्या एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा सोमय्यांनी यावेळी केला.

मढ स्टुडिओची पाहणी केल्यानंतर सोमय्यांनी शिवसेना आणि काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या १ हजार कोटींच्या घोटाळ्याचं प्रात्याक्षिक आपण बघत आहोत. कोणत्याही पर्यावरण कायद्यात, सीआरझेड कायद्यात सीआरझेड एक, दोन विकास क्षेत्रात अशा बांधकामाची परवानगी देता येत नाही. जुलै २०२१ मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या जागेला भेट दिली होती. इथल्या २८ स्टुडिओंच्या बांधकामाचं मूल्यांकन एक हजार कोटी इतकं आहे. त्यावेळी परवानगी संपली होती. पण आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघा मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दादागिरी केली. भ्रष्टाचारी पद्धतीने जुलै २०२१मध्ये तात्पुरती परवानगी संपल्यानंतर देखील हे बांधकाम तोडलं नाही, असं ते म्हणाले.

या बांधकामाला बेकायदेशीर असल्याची नोटीस देऊन एक महिना झाला. पण अजूनही जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे अधिकारी करतायत काय? इथे बांधकाम तोडलं नाही तर दुसरा मजलाही बांधला. त्यामुळे मी महापालिका अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि पर्यावरण सचिवांना इशारा देतोय. महाविकास आघाडीच्या कामात त्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला असेल. पण आता ते दिवस संपले आहेत. ताबडतोब या स्टुडिओच्या मालकांवर गुन्हा नोंदवा आणि कारवाई करा, असं सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने