Rahul gandhi  Team Lokshahi
राजकारण

राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड, व्हिडीओ व्हायरल

Published by : Shubham Tate

Rahul Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या केरळमधील वायनाड येथील खासदार कार्यालयाची शुक्रवारी तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या भूमिकेचा आरोप पक्षाने केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. एका ट्विटमध्ये, भारतीय युवक काँग्रेसने आरोप केला आहे की "एसएफआयचे झेंडे घेऊन गेलेले गुंड" राहुल गांधींच्या वायनाड कार्यालयाच्या भिंतीवर चढले आणि तेथे तोडफोड केली. (Kerala: Congress MP Rahul Gandhi's office in Wayanad vandalised)

घटनेची माहिती देताना काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल म्हणाले, "आज दुपारी 3 च्या सुमारास SFI कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या एका गटाने वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला केला. त्यांनी कार्यालयातील लोकांवर तसेच राहुल गांधी यांच्या कर्मचाऱ्यांवर हा हल्ला केला. याचे कारण आम्हाला माहित नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेस नेते पुढे म्हणाले, "ते म्हणतात की ते बफर झोनच्या मुद्द्यावर आंदोलन करत आहेत. याप्रकरणी राहुल गांधींची भूमिका काय आहे हे मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, त्या मुद्द्यावर काही करता येत असेल तर ते केरळचे मुख्यमंत्री करू शकतात."

राहुल गांधींच्या कार्यालयावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करताना केसी वेणुगोपाल म्हणाले, त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे, पण हे SFI कार्यकर्ते राहुल गांधींच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्यावर कसा हल्ला करत आहेत, हे आम्हाला समजत नाही.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू