election 
राजकारण

कसबा पेठ, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या जागांवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.

कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी व ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर, १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २ मार्च रोजी मतमोजणी होईल, असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे.

दरम्यान, मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. कोणत्याही आमदार वा खासदाराचे निधन झाल्यास विरोधकांकडून त्या जागेवर उमेवार उभा केला जात नाही. बिनविरोध निवडणूक पार पाडण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू