कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जीवाचे रान करून प्रचार केला. आता उद्या म्हणजेच बुधवारी या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. बुधवारी 10 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
या निवडणुकीसाठी सुमारे 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार करणार आहेत. 224 जागांसाठी मतदान पार पडणार आहे यात 2,615 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. सोबतच प्रशासनाकडून देखील या निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कर्नाटकातील 58,545 मतदान केंद्र सुसज्ज ठेवण्यात आली असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काँग्रेस, भाजप आणि जेडीएस या तीन पक्षात मुख्य लढत होणार आहे.
एकूण इतके असणार मतदार:
कर्नाटकात आज 5.3 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यामध्ये 2.66 कोटी पुरूष तर 2.63 कोटी महिला मतदारांचा समावेश असणार आहे.
जवळपास 11.71 लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
5.71 लाख दिव्यांग मतदार असणार आहेत.
12.15 लाख मतदार हे 80 पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक मतदार करतील.
16 हजार मतदार हे 100 वर्षे पेक्षा जास्त वयाचे 2615 उमेदवार असणार.
224 मतदारसंघात 58545 - मतदान केंद्र
12000 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कर्नाटकाव्यतिरिक्त शेजारच्या राज्यातून 2716 पोलीस अधिकारी आणि 5784 होमगार्ड तैनात.
घरातून मतदानाचा प्रयोग पहिल्यांदाच
80 वर्षे पेक्षा जास्त वय असेलेल ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निवडणूनक आयोगाची विशेष सोय
29 एप्रिल ते 6 मे या कालावधीत करू शकणार घरातून मतदान
घरातून मतदान करण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक
काय काय केलं जप्त?
375 कोटींची रोकड, दारू, ड्रग्स जप्त
2018 च्या तुलनेत साडेचारपटीने वाढ
याशिवाय आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या दोन आठवड्यात 83 कोटी केले होते जप्त
प्रमुख उमेदवार:
बसवराज बोम्मई - शिगाव
सिद्धरामय्या - वरुणा
एच. डी. कुमारस्वामी - चन्नापटना
डी. के. शिवकुमार - कणकपुरा
जगदीश शेट्टर - हुबळी-धारवाड सेंट्रल