नाशिक : शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी आज नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्यजित तांबेंच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे यांनी गद्दारी केली नाही, असे म्हणत सत्यजित तांबेंना पुढे आणा हे मीच सांगितले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
निवडणूक 30 तारखेला आहे. ज्येष्ठ पक्षाने निवडणुकीतून पळ का काढला ते कळत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. फसवणूक कोणी व कशी केली, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
आमची शिक्षक भारतीची भूमिका जाहीर केली. शिक्षक प्रश्न पुरोगामी प्रश्न यांच्यासोबत राहायला पाहिजे. काँग्रेसच्या घरातील असले तरी त्यांचा विचार लाल बावट्याचा आहे. सुधीर तांबे पेन्शन आणि अनुदान प्रश्नावर आपल्या सोबत असतात. जो जो पीडित आहे त्यांच्या सोबत सुधीर तांबे राहतात. सत्यजित तांबेंना पुढे आणा हे मीच सांगितले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे. कारण सत्यजितला प्रश्नांची जाण आहे. युथ काँग्रेसला निवडून आणण्याची क्षमता देखील त्याच्यात होती. या अशा तरुणाला संधी दिली पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे यांनी गद्दारी केली नाही. तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे. तुमच्यावर अन्याय झाला असून त्याहून जास्त अन्याय सत्यजित यांच्यावर झाला आहे. सत्यजित तांबे सांगतात की सत्य परेशान हो सकता है पराजित नाही. सत्यजित तांबे यांना आमचा पाठिंबा आहे. शिक्षक, पदवीधर, पुरोगामी प्रश्नावर तुम्ही असले पाहिजे. विधान परिषदेत आल्यानंतर आमचा अधिक दबाव सत्तेवर राहील. बिनशर्तपणे सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर करतो. सत्यजित तांबेंचाच विजय होणारच आहे, असे कपिल पाटील यांनी जाहिर केले आहे.