राजकारण

Kalyan : शिवसेनेच्या उपशहर प्रमुखावर प्राणघात हल्ला

माजी नगरसेवकाने हल्ला केल्याच्या आरोप ,मात्र नगरसेवकाकडून आरोपाचे खंडन

Published by : Shweta Chavan-Zagade

अमझद खान | कल्याण : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक शिवसेनेच्या उपशहर प्रमुख हर्षवर्धन पलांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर शहरात एकच खरबड उडाली आहे. या हल्ल्यामागे शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या नाव पलांडे यांनी घेतला आहे. मात्र या घटनेची माझ्या काडीमात्र संबंध नाही पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहेत.

कल्याण पूर्वेतील संतोषी माता रोडवर ही घटना घडली आहे. आज सकाळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे काही कामानिमित्त आपल्या गाडीने जात असताना तीन ते चार अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. पालांडे यांच्या आरोप आहे की, हल्लेखोर यांच्या हातात लोखंडी रॉड आणि तलवार या धारदार शस्त्र होते. शिवसेनेत तू जास्त उडतोय असे सांगत हल्लेखोराने पलांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पालांडे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

कल्याणच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात कल्याण आणि उल्हासनगर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये जमा झाले, पालांडे यांच्या आरोप आहे की या हल्ल्यामागे शिवसेनेच्या माजी नगरसेवक महेश गायकवाड हे आहेत त्यांचा लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे .पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. याबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे म्हणणे आहे की ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेची माझ्या काही संबंध नाही .पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि जो कोणी माझा नाव घेत आहे या संदर्भात मी कोर्टात दावा दाखल करणार आहे. पालांडे यांचा आरोपाचा गायकवाड यांनी खंडन केले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. नक्की पोलिसांच्या तपासात काय समोर येतो हे पाहावे लागेल. मात्र ज्या प्रकारे हा हल्ला झाला आहे दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी