राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे आव्हाड पुन्हा चर्चेत आले आहेत. तर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत.
आव्हाडांचं ट्वीट नेमकं काय?
"पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत" असं ट्वीट जितेंद्र आव्हाड आंनी केलं आहे.
काय आहे राजीनामा देण्यामागचं कारण?
आव्हाडांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा आठवडाभरातील जितेंद्र आव्हाडांवर दुसरा गुन्हा आहे. मुंब्रा वाय ब्रीज उद्घाटनावेळी घडलेल्या प्रकारामुऴे आव्हाडांवर भाजप पदाधिकारी महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल. यामुळे आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.