मुंबई : आक्षेपार्ह शब्द असलेल्या रॅप गाण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विनापरवानगी चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हे गाणे केलेल्या शुभम जाधवला पाठिंबा दिला. यावरुन लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समाजातील अस्वस्थता घालवणे हेच आपले काम आहे. गोदरेज, बिर्लासाठी काम करायला नाही. त्यांच्यासाठी काम करायला वरचे आहेत, असा निशाणा जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीसांना साधला आहे. मी मुंगासेंना ओळखत नव्हते. परंतु, ज्यांचा आवाज दाबला जातो त्यांच्या मागे उभे राहणे माझे प्रथम कर्तव्य समजतो. माझ्या बापाने शरद पवार यांनी तेच शिकवेले आहे. शुभम जाधववर गुन्हा दाखल झाला. मात्र, तीन मिनीटांच्या गाण्याला एवढे का घाबरले? 50 खोके हे तुमचे आडनाव नाही. तुमचा आडनावच तुम्ही स्वतःहून 50 खोके करता तर त्यात महाराष्ट्राचा दोष नाही, असा जोरदार टोलाही त्यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.
दरम्यान, सल्तनत या युट्यूबवर प्रदर्शित केलेल्या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनीच विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे लेखी तक्रार केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विद्यापीठात गाणे शूट का परवागी दिली याबाबत त्यांचा आक्षेप होता. गाण्याविरोधात कोणताही आक्षेप नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.