मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चायना मेड म्हणत टीका केली होती. या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला चायना मेड म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे, असा सल्ला आव्हाडांनी नितेश राणेंना दिला आहेत. तर, मी माझा राजकीय आयुष्यात गांभीर्य असणाऱ्या लोकांबाबतच बोलतो हे असले उंची छोटी, भेजा छोटा असलेल्यांबाबत बोलायचे नसते, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.
काही काम नसल्यावर लोक हात आणि ज्योतिष बघायला सुरुवात झाली अशांना कधीही गांभीर्याने घेतलं नाही आणि घेऊ देखील नाही काही लोकांना असेच सोडून द्यायचे असते. नितेश राणे हे चायना मेड आहे की चायनीज मेड आहे ते त्यांनी स्वतःकडे बघून आकलन करावे. मी माझा राजकीय आयुष्यात गांभीर्य असणाऱ्या लोकांबाबतच बोलतो हे असले उंची छोटी, भेजा छोटा असलेले बाबत बोलायचे नसते काही कॉमेडी आणि जोकर असतात त्यांना जोक मारून द्यायचे असते. त्यावर आपण मनसोक्त हसायचे असते, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हंटले आहे.
संजय राऊत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला होता. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, संजय राऊत यांना बोलू नका. काही वर्षांपूर्वी कोण कोणाकडे जाण्यासाठी आटापिटा करत होते हे आम्हाला व्यवस्थित माहित आहे. आम्ही बोलत नाही हे आमच्या मनाचा मोठेपणा समजा. बंद मुट्टी लाख की खुल गई तो खाकी, असा इशाराच त्यांनी नितेश राणेंना दिला आहे.