राम मांसाहारी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. रामाला आदर्श मानून मटण खातो, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी काल जे बोललो ते ओघात बोललो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. वाद मला अजून वाढवायचा नाही. जे मी बोललो त्यांचे पुरावे आहेत. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. आजकाल अभ्यासाला महत्व नाही भावनांना महत्व. माझ्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर खेद व्यक्त करतो. खेद व्यक्त केला म्हणजे मला दु:ख झाले.
रोहित पवारांना मी फार महत्व देत नाही. रोहित पवार अजून लहाण आहेत. त्यांची पहिली टर्म आहे. मी कुठलंही प्रकरण एकटा लढतो, पण पक्ष माझ्यासोबत. मला रामाबद्दल सांगण्याचा कुणी प्रयत्न करु नये. ज्यांना भांडायचे नसते ते टीका करतात. माझ्या वक्तव्याचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही.