Jaynat Patil Team Lokshahi
राजकारण

ट्विटच्या वादावरून जयंत पाटीलांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टोमणा; म्हणाले, एलोन मस्क...

मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना, अशातच शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून झाली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसला. मात्र, विशेष म्हणजे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटची चर्चा चांगलीच रंगली. त्यातच चिथावणी देणारं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं ट्वीट फेक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सभागृहात सांगितले. त्यावरूनच आता राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवरून भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे विधान केले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलोन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? असा टोमणा ट्विटरवरून जयंत पाटील यांनी मारला आहे.

चिथावणी देणारं ट्वीट माझं नाहीच- मुख्यमंत्री बोम्मई

चिथावणी देणारं ट्वीट माझं नाहीच, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. त्यानंतर अमित शहा यांनी चौकशीचे आदेशही दिलेत. विरोधक म्हणतात, व्हेरिफाईड अकाउंटवरचं ट्वीट खोटं कसं. सीमावादावरून झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचं ट्वीट फेक असल्याचं सांगितलं. त्यावरून आज अधिवेशान विरोधकांनी सवाल केलेत. महाराष्ट्राला चिथावणी देणारे ट्वीट माझ्या अकाउंटरून झालेले नाहीत. ते अकाउंट माझं नाही, असं बोम्मई म्हणालेत. पण, ज्या अकाउंटवरून ते ट्विट आलं ते ब्ल्यू टीक आहे. याचा अर्थ हे अकाउंट ट्विटरकडून व्हेरिफाईड झालेलं आहे. त्यावर बसवराज एस. बोम्मई असं नाव लिहिलेलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी