पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. विधानभवन परिसरातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे. तो फोटो म्हणजे सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या गळाभेटीचा.
याच पार्श्वभूमीवर आता स्वत: जयंत पाटील यांनी एका माध्यमाशी बोलताना या गळाभेटीबाबत सांगितले आहे. जयंत पाटील म्हणाले की, आम्ही काही खाजगी चर्चा केली. आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. त्यांनी ठरवले ते पवार साहेबांना सोडून गेले आहेत. पवार साहेब जे सांगतील तेच आम्ही ऐकणार आहोत. माणसांशी बोलणे कठीण झाले आहे. डोक्यात काठ्यांच घालणे अपेक्षित आहे का? आमच्या भेटीचा राजकीय संबंध नाही. असे जयंत पाटील म्हणाले.