Jayant Patil Says Vasantdada Patil Promoted Sharad Pawar Team Lokshahi
राजकारण

'वसंतदादांनी शरद पवारांना प्रमोट केलं' जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा

वसंतदादांनी शरद पवारांना प्रमोट केलं, वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसल्याच्या आरोप वरून जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा.

Published by : Vikrant Shinde

संजय देसाई, सांगली

महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्व हे शरद पवारचं आहेत, हे वसंतदादांनी देखील ओळखलं होतं, आणि वसंतदादांनी शरद पवारांना प्रमोट केलं,अश्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी किस्सा सांगितला आहे.सांगलीच्या आटपाडी मध्ये आयोजित शेतकरी अभ्यास मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

राज्याच्या राजकारणात नेहमीच वसंतदादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला याची चर्चा होते,आणि अनेक राजकीय नेते राष्ट्रवादीवर व शरद पवारांच्यावर खापर फोडताना मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील यांचं सरकार शरद पवारांनी कसं पाडलं याचा दाखला देताना वसंत दादांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसला या शब्दात उदाहरण देतात.त्यामुळे शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असं बोललं जातंय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यामध्ये वसंतदादा पाटलांनी शरद पवार यांना प्रमोट केल्याचं गौप्यस्फोट केले आहे.

"वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना आपले मोठे बंधू भगतसिंग पाटील हे एका कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार हे महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणातील नेतृत्व असल्याचा स्पष्टपणे सांगितलं होतं,त्यावेळी शरद पवारांना वसंतदादा पाटील यांनीच एका अर्थाने प्रमोट केलं आणि त्यांच्या डोक्यात देखील महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शरद पवार हे एकमेव नेतृत्व असेल असं होतं",अश्या शब्दात जयंत पाटलांनी आटपाडीतल्या शेतकरी अभ्यास मेळाव्यामध्ये त्यावेळचा किस्सा सांगितला.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...