अमोल धर्माधिकारी | पुणे : महाविकास आघाडीची वज्रमूठ आज दिसेल. सभेच्या जवळ गौरव यात्रा असली तरी काही होणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. जयंत पाटील यांनी आज गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व सांत्वन केले. यावेळी ते बोलत होते.
गिरीश बापट यांचे आताच निधन झाले आहे. त्यामुळे त्याबाबत आम्ही कुणीही विचार केलेला नाही. बापट यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आपुलकी होती. शरद सपवार यांनी देखील सर्व कार्यक्रम सोडून बापट यांच्या दर्शनाला आले होते. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षात याची चर्चाही केलेली नाही. आणि पुढे काय करायचं याबाबतही सुताराम चर्चा केली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. सर्व नेते एकत्र येणार आहेत. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर उहापोह होईल. महाविकास आघाडीची वज्रमूठ आज दिसेल. सभेच्या जवळ गौरव यात्रा असली तरी काही होणार नाही. आमचे कार्यकर्ते आमच्या सभेसाठी येणार आहे. पोलीस याची काळजी घेतील. ही सभा राज्यस्तरावर आहे. राज्यातील नेत्यांची सभा आहे. प्रत्येक पक्षाकडून एक एक प्रतिनिधी बोलताना दिसेल. प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं एकत्रित दर्शन दिसेल असे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ज्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी या तयार केलेल्या आहेत. उलट हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ हजारो सभासद मुंबईला जाऊन आले आहेत. हसन मुश्रीफ यांना सर्व मार्गाने अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक एफआयआर दाखल केली जात आहे. त्यामुळे ईडीची केस तयार होते. मग, त्यात मुश्रीफ यांना अटक करणे असं सगळ षडयंत्र रचण्यात आले आहे. सभासद प्रकरणी मुश्रीफ यांनी कधीच कुणाला अडवला नाही जे सभासद नाही तेच आता तक्रार करत आहे. त्यामुळे मुद्दाम केलेलं कटकारस्थान आहे, असा दावा जयंत पाटलांनी केला आहे.