raosaheb danve | arjun khotkar team lokshahi
राजकारण

खासदारकी काय मह्या बापाची आहे का?रावसाहेब दानवेंचा खासदारकी सोडण्यास नकारच

भाजप अन् शिंदे गट एकत्र निवडणुक लढवणार

Published by : Shubham Tate

raosaheb danve vs arjun khotka : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्यात एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. टीईटी घोटाळ्याबाबत प्रश्न विचारताच दानवेंनी आपल्या शैलीत अत्यंत सूचक उत्तर दिलं. त्याचप्रमाणे, शिंदे गटातील नाराजीवरही दानवेंनी यावेळी भाष्य केलं आहे. येत्या विधानसभेत आमचे 200 आमदार निवडून येतील असा दावाही दानवेंनी केला. जालना लोकसभा मतदार संघाविषयी विचारलेल्या एका प्रश्नालाही दानवेंनी यावेळी उत्तर दिलं. अर्जुन खोतकरांसाठी हा मतदार संघ सोडला जाणार नाही असंही दानवेंनी सांगितलं. (jalna politics raosaheb danve vs arjun khotkar)

संजय शिरसाट आणि कोणीच नाराज नाही, तुम्ही उगाच पाणी घालू नका. शिंदेची खरी शिवसेना आणि भाजपचे राज्यातले सरकार अडीच वर्षाचा काळ पुर्ण करणार आहे. या दरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही लढू आणि जिंकू. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील आम्ही दोघं मिळून दोनशे जागा निवडून आणू, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

अर्जुन खोतकरांसाठी खासदारकी सोडणार का? प्रयाश्नावर दानवे चांगलेच आक्रमक झाले. खासदारकी काय दानवेंच्या बापाची आहे काय? ही जागा सोडली तर पक्ष मला हाकलून देईल त्याचं काय? असा प्रतिसवाल करत खासदारकीसाठी आपणच असाच काहीसा रोष होता. आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी जागा कुणाला सुटणार यावर ते चांगलेच संतापले होते. तर ही भाजपाची पारंपरिक जागा असल्याचेही त्यांनी आठवण करुन दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news