Ambadas Danve Team Lokshahi
राजकारण

वादग्रस्त विधानांचा मुद्दा उद्या अधिवेशात उपस्थित करणार, अंबादास दानवेंची माहिती

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा वादात मराठी बांधाची बाजू सरकार घेत नाही आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज नवनवीन विषयावरून जुंपलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पाठोपाठ वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद देखील अधिकच तीव्र झाला आहे. या वादादरम्यान आता उद्यापासून नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशात विरोधक चांगेलच सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्याचे चित्र आहे. त्यावरच आता विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

महापुरुषांच्या अपमान भारतीय जनता आणि राज्यपालांनी केला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा वादात मराठी बांधाची बाजू सरकार घेत नाही आहे. ज्या पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री कानडी बांधवांची उघडपणे आणि आक्रमकपणे बाजू मांडत आहे. ती आक्रमकता महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये मुळीच नाहीये. या सरकारमधील मंत्री माता भगिनीं विषयी महिला प्रतिनिधी विषयी खालच्या स्तरावर टीका करतात आणि हे मंत्री कायम आहेत. अशा अनेक विषयांवर ती उद्या सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार असे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती