राजकारण

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाने सांगितले की, आम्हाला पारदर्शक निवडणूक पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपला माहित आहे की आम्ही हरतो आहे. भाजपच्या सोबत असलेल्यांना वाटतं की आम्ही हरतो आहे म्हणून हा रडीचा डाव शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचे काम हे लोक करत आहेत.

दम असेल तर आमने सामने लढा ना. हा रडीचा डाव करुन तुम्ही जो जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र माफ करणार नाही या भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना. हरणाच्या भितीमुळे हे पाप आता भाजप आणि महायुतीचं सरकार करत आहे. महाराष्ट्रामध्ये यांनी योजना दूताच्या नावाने 50 हजार रुपये त्या एका व्यक्तीला देऊन महाराष्ट्रामध्ये सरकारच्या योजना प्रत्येकाच्या घरी पोहचवण्याचे काम ते कोणाचे लोक ते आरएसएसचे, भाजपचे लोक आहेत. त्यांना शासकीय दूत तयार केलेत.

जनतेच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत आहे त्या पैशातून त्याची उधळपट्टी केली जाते. निवडणूक आयोगाला आम्ही आज ती मागणी करणार आहोत की, तातडीने ही जी योजनादूत नावाची बोगस लोक या महायुतीच्या बोगस कामाची माहिती देण्यापेक्षा त्यांनी किती चांगलं काम केलं हे सांगण्यासाठी ते फिरत असतील तर निवडणूक आयोगाने तातडीने या योजना दूतांची मान्यता रद्द करुन महाराष्ट्राच्या लोकशाहीला वाचवलं पाहिजे आणि राज्याच्या तिजोरीला वाचवलं पाहिजे. याची आम्ही मागणी करणार आहोत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीची हेरा फेरी करण्याचा जो लज्जास्पद प्रयत्न केला जात आहे त्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेच्याबाबत आम्ही त्यांना सांगण्यासाठी आज जाणार आहोत. त्यांना दीड वाजता आम्ही भेटणार आहोत. असे नाना पटोले म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...