मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती त्यासोबतच उद्योग या क्षेत्रांसाठीही घोषणा जाहीर केल्या आहेत. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्राचा विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात 1.27 लाख कोटींची तरतुदी कृषी क्षेत्रासाठी केली होती. तर 2023-24 मध्ये केंद्र सरकारने 1.25 लाख कोटी रुपयांची कृषीसाठी केली होती. 2022-23 मध्ये 1.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
पुढच्या दोन वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत केली जाईल. 10 हजार बायो इनपुट सेंटर बनवले जाणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळेल. डाळी आणि तेलबिया क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर फोकस असेल. सप्लाय चेन उत्तम बनवण्यासाठी क्लस्टर बनवले जातील. देशातील 5 राज्यात नवीन किसान कार्ड लागू होतील.