Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

महाडमध्ये उध्दव ठाकरे पुन्हा भाजप- शिंदे गटावर बरसले; वाचा संपूर्ण भाषण जशास तसं

उद्धव ठाकरे यांची कोकणातील रत्नागिरी नंतर ही महाडमधील ही दुसरी सभा...

Published by : Sagar Pradhan

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज महाडमध्ये जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांची कोकणातील रत्नागिरीनंतर ही महाडमधील ही दुसरी सभा होती. या सभेत ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी भाषण करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यासोबतच उध्दव ठाकरेंनी देखील या सभेत बोलताना पुन्हा भाजप आणि शिंदे गटावर हल्ला चढवला. वाचा उध्दव ठाकरेंचे संपुर्ण भाषण जशास तस.

भाजपने नीच डाव केला चिन्ह पक्ष चोरून त्यांना दिला.

काहींना वाटत होत शिवसेना संपवायला हवी काहीना शिवसेना म्हणजे तेच अस वाटत होत पण आता दसपटीने वाढतेय. काहींना माझ्यावर टीका केल्याने भाकरी मिळतेय. सर्व जगताप कुटुंबीयांचे आणि तुमचे स्वागत. ऐतिहासिक मैदानातच जगताप कुटुंबीयांचा प्रवेश घेण्याचा हट्ट. काहींच्या पोटात गोळा पुढच्या निवडणुकीत डिपाॅझिट जप्त होणार. आपण काही न देता सेन्हल ताई आपल्यात आल्या. काहींनी गद्दारी केली, भाजपने फुस लावली. भाजपने नीच डाव केला चिन्ह पक्ष चोरून त्यांना दिला. मी फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव वगळता माझ्याकडे काहीच नाही. अजून काही लोक सोबत येणार आहे. मविआ म्हणून सोबत आहोत. विधानपरिषद निवडणुकीत अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार शिवसैनिक. असे एकजुटीने लढल्याशिवाय भाजपचा पराभव होणार नाही.

मैदानातील फटाके विरोधकांच्या बुडाखाली फुटतील

सकाळी बारसुला जाऊन आलो. महाड मतदारसंघ भगव्याचा आपला आहे, केवळ निवडणुकी पुरता नाही. शिवसैनिकाला पेटवण्याचा प्रयत्न करु नये नाहीतर मैदानातील फटाके विरोधकांच्या बुडाखाली फुटतील. महाडच्या ऐतिहासिक महापुरुषांची आठवण, म्हणून इथे भगव्याला हात लावायची कुणाची हिंमत नाही. निष्ठा कशी ते तानाजींनी दाखवले. सगळा इतिहास आपल्या माहिती आहेच. भगव्याशी बेइमानी नाही. अशी ही भूमी आहे.

बारसुसाठी म्हणून माझ्याकडून पत्र दिल्या गेले

माझ पत्र दाखवल्या जातय. मला भिती नाही कारण मी पाप केले नाही. गद्दारांनी मलिदा खाल्ला उपऱ्यांना जमिनी विकून. मी मुख्यमंत्री म्हणून ठरवल होत नाणार होऊ दिल नाहीच. हे गद्दार माझ्याकडे यायचे बारसुसाठी म्हणून माझ्याकडून पत्र दिल्या गेले. अंतिम मंजुरी मी स्वतः जाऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन ठरवणार होतो. सगळ पोलीस बल बारसुत नियुक्त केले आहे. काय चालवलय? इतका बंदोबस्त चीन सीमेवर लावले असते तर चीनने घुसखोरी केली नसती. पण बारसुत लाठ्या, अश्रुधूर का वापरता. तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे जनतेत का जात नाही? आता लोकांना तडीपारी करताय. प्रकल्प जोवर कोकणी बांधव हो म्हणत नाही तोवर होऊ देणार नाही. पत्रकारांना अडवलय. मातीची चाचणी करता मग मातीतल्या माणसांना पण विचारा. देश म्हणजे दगड धोंडे नाहीत. रिफायनरी जर आली तर कोकणी माणसाला काय भांडवलदारांच्या दारात उभे करणार आहात? याचे उत्तर कुणाकडे नाही. गद्दारांनी खोके घेतलेयात.

मुख्यमंत्री सुरत गुवाहटी दिल्लीला जातात इकडे आले होते का?

तळये गावांच्या कटु आठवणींचा संदर्भ आणि विचारपूस. तळये गावाचे पुनर्वसनाचे आदेश दिले, पण अद्याप किती लोकांना घर मिळाली. सरकारी आकडेवारीचा संदर्भ. दोन वर्षात फक्त १५ घरे दिली. पत्रकारांनी माहिती घ्यावी. हे चुकीचे असेल तर आनंद. इथल्या आमदाराला असा घाम फोडायचाय की नॅपकिन कमी पडेल. दोन वर्ष होत आलीत मग जनतेचे पुनर्वसन का नाही. मुख्यमंत्री सुरत गुवाहटी दिल्लीला जातात इकडे आले होते का? बोम्मई पुन्हा बरळले. अनेक वर्ष तिथे भाषिक अत्याचार सुरु आहे पण आमचे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार म्हणतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कानडीत जाहीरात करतात. मिंधेंध्ये हिंमत असेल तर पत्रकार परिषद घ्यायला हवी तिथे.

शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला याची आठवण

निवडणुकीत जनतेची मते मांडायला हवी. पण हे मन की बात करतात. २०१४ साली दिलेले आश्वासन काय होती? त्यावर कोणी विचारले की तुरूंगात टाकायचे. जातीय दंगली घडाव्यात. अवाजवी आश्वासने द्यायची सोन्यासारखे तुम्ही मत देता. वाद लावायचे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला याची आठवण. आज पंतप्रधान म्हणतायत मतदारांना बजरंगबलीचे म्हणा मग तुमचे बळ,५६ इंच छाती कुठे आहे? यापुढील प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणून भाजपला तडीपार करा. सत्यपाल मलिकांच्या मुलाखतीचा संदर्भ. सैनिकांचा उपयोग भाजपने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला. विमाने दिली नाहीत ४० लोक गेलीत आणि हे मते मागत होते. अटलजींची आदर्श आठवण.

इकडे एक आहे एकावर दोन फ्री

भारत माता की जय म्हटले तो देशप्रेमी होत नाही. सैनिकाकडे बुलेट जनतेकडे बॅलेट. सत्यपाल मलिकांकडे सीबीआय. इतर पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा. प्रियंका गांधींकडून मोदींना जोरदार प्रत्युत्तर. इकडे एक आहे एकावर दोन फ्री. त्याला काय कळवावे समजत नाही. दोन पोर सांभाळायची तर डोक्यावरचा टोप जाईल. माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत कारण तुम्ही सर्व माझे नातेवाईक आहात.

आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपने भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही.

मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला प्रबोधकार शिवसेनाप्रमुखांनी सांगितलय. भाजपचे हिंदुत्व काय आहे? गोमूत्रधारी. मेहबूबा मुफ्ती सोबत बसले तुम्ही काय सोडले? भागवत मशिदीत गेले मी काही बोललो. कश्मीरातील सैनिक औरंगजेबाच्या हौतत्म्याची आठवण. देशासाठी लढणारा आमचा, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपने भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. बीजेपी आता भ्रष्ट जनता पार्टी झालीय. मेघालयात अमित शहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. पण साध्या माणसांवर धाडी टाकताय. कुठे आहे हिंदुत्व ? कुटुंब उदध्वस्त करायचे. मोदी व्यक्ती विरोधात नाही वृत्ती विरोधात मी आहे. देशातले तेज आपल्या महाराष्ट्रात जन्मले शिवाजी महाराज. चवदार तळ्यावरचे वाक्य मानवी अधिकरांसाठी आठवण.

कायद्याचा वापर करा पण गैरवापर करु नका

निवडणुका येतील जातील. पण २०२४ साली आपण ही वृत्ती गाडली नाही तर लोकशाही संपेल.नड्डांच्या विधानाची आठवण. तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा तुम्ही मोदींचे नाव घेवून या मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. काहीतरी स्वीकारा. पोलीसांना पण सांगतो सरकार येईल जाईल हे सरकार हलायला लागलय. कायद्याचा वापर करा पण गैरवापर करु नका. मी माझी पातळी सोडली नाही मला तशी गरज नाही. काहीही हातात नसतांना जमलेले आशीर्वाद माझ्यासाठी खूप आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी कसा होतो हे जगजाहीर. मला लिहण्याची सांगण्याची गरज नाही. तुम्ही शपथ घ्या भगवा कायम फडकत ठेवा. मी तुम्हाला राज्यात भगवा फडकवून दाखवतो.

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result