मी जर संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला असेल तर मी जाहीर माफी मागतो. सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 24 तारखेपासून राज्यात गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार. रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा आमदाराने मराठा आरक्षणाची भूमिका घेतली नाही असा गैरसमज समाजात पसरला, म्हणून त्यांनी आमच्या दारात येऊ नये असा ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आल्या आहेत.
मी मराठ्यांच्या बाजूचा आहे, यांचा ट्रॅप आहे, यांना आंदोलनात काही मिळालं नसेल म्हणून ते अस बोलतात. तो शिंदे साहेबांचा प्रवक्ता म्हणून येत होता. त्याच्या हाताने पाणी पिल असतं तर तो मोठा झाला असता. यात शिंदे साहेबांचा पण एक प्रवक्ते आहे. सरकार कडून मला बदनाम करण्याचा हा ट्रप आहे. तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून शब्द निघाला असेल तर मी माफी मागतो. समाज जर मला उद्या बाजूला सरक म्हणलं तर मी एका मिनटात लगेच बाजूला होतो. ट्रॅप लावण्यात आणि सरकारला वाचवण्यात हे बाहेर येत आहेत. हा त्यातला पहिला आहे, अजून 2/3 जण यामध्ये आहे. तू कशाचा महाराज आहे, हा ट्रॅप आहे असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 1 मार्च रोजी वृद्ध मराठा समाज हा उपोषणाला बसणार आहे. उपोषणादरम्यान त्यांच्या जिवाला काही धोका झाल्यास ती जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल असा ठराव ही आजच्या बैठकीत आज घेण्यात आला. 1 मार्च रोजी राज्यातल्या आजी माजी आमदार आणि खासदार यांच्या सह सर्व मंत्र्यांची बैठक अंतरवालीत बोलवण्यात आली आहे. 3 मार्च रोजी जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर 4 मार्च रोजी जिल्हास्तरावर रस्ता रोको आंदोलनानंतर अंतरवालीत बैठक बोलवली आहे.
त्या बैठकीत मुंबईला जायचे का नाही किंवा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन कसे करायचे याबाबत चर्चा होणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सह निवडनुक आयोगाला विनंती करण्यात आली आहे, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. आम्ह आचासंहितेचा मान राखतो.