मुंबई : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा आझाद मैदान येथे काढण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा अर्थ मला कळत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. त्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे
एकतर मोर्चा म्हणजे सरकार विरोधात आहेत. हे असंवेदनशील सरकार आहे म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे. लव्ह जिहादचा अर्थ मला माहित नाही. लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा अर्थ मला कळत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
शिवसेना कुणाची यावर उद्या निवडणूक आयोगात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे स्पष्ट मत आहे की शिवसेना स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यांचे उत्तराधिकारी बाळासाहेबांनीच ठरवले असल्यामुळे त्यांनाच चिन्ह मिळायला हवे, असे मत त्यांनी मांडले आहे.
तसेच, सगळं दुर्दैवी आहेत. हे ईडी सरकार प्रशासनात कमी आहेत आणि चुकीची कामं पण चालू आहेत. हे लोकं मोदीजी यांचे भाषण ऐकत नाहीत. मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे. सेवा सोडून हे लोक सगळेच काम करतात. शिवाय, ते रोजच आरोप करत आहेत. सहा महिने सत्तेत आल्यापासून या लोकांनी काहीच काम केलेलं नाही. स्वतःचं काही सांगण्यासारखे नाही. त्यामुळे रिवाइंड आणि प्ले हे काम ईडी सरकार करत आहे, असा निशाणा सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे