एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदारांनी सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास केला. गुवाहाटी, सूरतचा, चार्टर्ड प्लेनचा खर्च कुणी केला? आमची दसऱ्याची सभा त्यांनी ढापण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात १० कोटी रुपये एसटीला देण्यात आले होते. कोणताही पक्ष अस्तित्वात नसताना हे पैसे कुठून दिले गेले होते? यावर चर्चा व्हायला हवी. हा सरकारी खर्च होता की कुणाच्या खोक्यातून आला होता? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यांच्या या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय गायकवाड म्हणाले की, गुवाहाटीचा खर्च मी केला होताअसे संजय गायकवाड म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही घरात बसून होते. तुम्ही शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना काय दिलं? कितीही विरोधी पक्ष नेते एकत्र आले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करु शकत नाही. असे देखिल संजय गायकवाड म्हणाले.