मावळ, पुणे : कुंकू हे सध्या राजकारणाचा मध्यवर्ती विषय बनला आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात मोठे वादंग उभे राहिले होते. यानंतर आज पुन्हा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विधानाने कुंकू चर्चेचा विषय बनला आहे.
अजित पवार मागील काही दिवस राजकीय वर्तुळातून गायब होते. यानंतर आज ते पहिल्यादांच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. मावळातील तळेगांव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटर या कार्यक्रमात अजित पवार पोहचले. अजित पवारांचे औक्षण करून त्यांना ओवळण्यात आले. यावेळी तरुणी अजित पवारांना कुंकू लावत असतानाच मला कुंकुवाची अॅलर्जी आहे, हळद लाव, असे अजित पवारांनी सांगितले. अजित पवारांचे हेच वक्तव्य आता चर्चेचा विषय बनला आहे. आता संभाजी भिडे गुरुजींसोबत जोडले जात आहे.
काय होते संभाजी भिडेंचे वक्तव्य?
एका महिला पत्रकाराने भिडेंना प्रश्न विचारत असतानाच ते म्हणाले, आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असे त्यांनी म्हंटले होते. यावर सर्वच स्तरावरुन भिडेंवर टीका करण्यात येत होती. तर, याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे.