राजकारण

Chhtrapati Sambhajinagar: संभाजीनगर येथे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण

भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल.

Published by : Dhanshree Shintre

भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल. यामध्ये 500 तरुण आमरण उपोषण करतील. एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, तर येत्या निवडणुकांत धनगर समाज एकाही पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली. धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे उपोषण करण्यात येणार असल्याचा ठरावही अधिवेशनात पारित करण्यात आला.

सकल धनगर समाजाच्या वतीने गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी, राजकीय भूमिका, आरक्षणासाठीचा न्यायालयीन व रस्त्यावरील लढा, आगामी निवडणुकीच्या संदर्भाने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक, उपोषणकर्ते, कार्यकर्ते एकवटले होते.

धनगरांना एसटी आरक्षण, विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व, धनगरांचे एकीकरण, कलम 342 (1) नुसार राज्यपालांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी, डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा आदी ठराव करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील धनगर बहुल मतदारसंघातून यशवंत संदेश यात्रा काढण्याचा निर्णय झाला असून, विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी