6 एप्रिल 1980 रोजी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाची (bjp)स्थापना झाली. तत्पूर्वी 1952 शामाप्रसाद मुखर्जी (shyama prasad mukherjee)यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (pandit neharu)यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन जनसंघाची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांच्या सोबत पंडित दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी,(atal bihari vajpayee) लालकृष्ण अडवाणी होते. पण पुढे आणीबाणी नंतर झालेल्या 1977 च्या निवडणुकांमध्ये सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. परंतु आपसातील मतभेदांमुळे हे सरकार टिकू शकले नाही व यातूनच भाजपा ची स्थापना झाली.
1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली व त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या अर्थात भाजपाच्या फक्त 2 जागा निवडून आल्या. बाकी सर्वत्र देशभरामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर 1989 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला व त्यांची संख्या 2 वरून 89 पर्यंत पोहोचले.
2014 ते 2019 या कार्य काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावर भाजपने सर्व विधानसभा निवडणुका लढल्या व बहुतांश ठिकाणी त्यांना न भुतो न भविष्यती अशा स्वरूपाचे यश मिळाले. आणि हाच करिष्मा कायम ठेवत 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने एकट्याने लोकसभेच्या 302 जागा मिळविल्या. दोन खासदारांपासून 302 खासदारांपर्यंत च्या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कष्ट केले, मेहनत घेतली व त्याचे फळ आत्ताच्या लोकांना मिळते आहे, अशी भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.