राजकारण

CM Eknath Shinde: राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नागरिकांना 'या' सूचना

Published by : Dhanshree Shintre

मुंबई, पुणे आणि रायगड यामध्ये जास्तीचा पाऊस पडतोय. उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस जास्त आहे. परंतू एकांदरित सर्वच प्रशासनाला आम्ही सकाळपासून सूचना करतोय त्यांना अलर्ट केलेलं आहे. फील्डवर उतरुन लोकांची मदत करण्याची आम्ही सूचना केल्या आहेत. पुण्यामध्ये खडकवासल्यामध्ये डॅममध्ये पण भरपूर पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 मिमी पाऊस पडला. मुळशीमध्ये 170 मिमी पाऊस पडला. त्याच्या एकदम दुहेरी फटका बसला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेले आहे आणि पाणी साचलेलं आहे. लोकल ज्या यंत्रणा आहेत हे सर्व यंत्रणा काम करत आहेत. मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहेत त्याही तैनात ठेवा आवश्यकता भासली त्यांनाही मूव करा. आता आर्मी देखील मूव करते आहे. एखाद्या ठिकाणी कुठे लोकं अडकली असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत आणि सर्वांना सांगितले आहे की मिळून टीम वर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणात मदत करा. जिथे पूर परिस्थिती आहे त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचं पाणी, फूड पॅकेट, राहण्याची देखील व्यवस्था कण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळांना आणि कार्यालयांना सुट्टया देण्याचे सूचना केल्या आहेत. सगळ्यांशी सातत्याने संपर्क साधतोय. अधिकारी माझ्यासोबत संपर्कात आहेत. इथे मुंबईमध्ये देखील अजित दादा कंट्रोल रुममध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क सुरु आहे तेही माहिती घेत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबईमध्ये देखील आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो. तर जवळपास 222 पंप सुरु आहेत आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे. बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं आहे. ते पाणी काढण्याचं काम सुरु आहे. रेल्वे सुरु आहे बाकी वाहतूक सुरळीत सुरु आहे आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत. आता मुंबईमध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुढचे 3-4 तास आणखी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी देखील अत्यावश्यक काम असेल तर घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं असं प्रकारचं देखील आवाहन आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी देखील विनंती मी नागरिकांना करतो. नागरिकांचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ते सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News