कोल्हापूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी एका आमदाराचं नाव सांगावं आणि घेऊन टाकावं. मी त्या आमदाराचा सत्कार करतो. बोलण्यासाठी काही तरी बोलावं लागत आहेत. त्यांनी आपल्याजवळ असलेले आमदार सांभाळावेत, असा सल्ला हसन मुश्रीफांनी जयंत पाटलांना दिला आहे.
कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केलं आहे, सर्वोच्च न्यायालयात त्याची लवकरच सुनावणी होईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल विचारविनिमय होऊन जरांगे यांच्याबरोबर चर्चा होईल