संजय राठोड, यवतमाळ
मंडल आयोग लागू झाल्यानंतर जरी विदर्भातील कुणबी समाज ओबीसीत आधीपासून सामील होता. परंतु २००१ नंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, असा तत्सम असल्याचा जी.आर ( आदेश) १ एप्रिल २००१ रोजी सरकारने काढला.
त्या जी.आरचा गैरफायदा घेत खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील जवळपास ७० ते ८० टक्के मराठा समाजाने कुणबी असल्याचे दाखले घेऊन शिक्षण व नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला.
ओबीसी आरक्षणाला पूर्वीपासूनच प्रचंड असा धक्का लागलेला आहे. परंतु दुर्दैवाने भुजबळ यांच्या अडमुठी भूमिकेमुळे ओबीसी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि ते यापुढे कायमचे होत राहील, असा आरोप माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केला आहे