Hardik patel  Team Lokshahi
राजकारण

काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार ?

नुकतच हार्दिक पटेलने भाजपचे कौतूक केले होते, तर कॉग्रेसवर नाराजीही व्यक्त केली होती.

Published by : left

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गुजरातमधील काँग्रेसचे फायर ब्रँड नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) हे भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा सूरू झाली आहे. नुकतच त्यांनी भाजपचे कौतूक केले होते, तर कॉग्रेसवर नाराजीही व्यक्त केली होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आपला व्हॉट्सअ‍ॅप डीपी (WhatsApp DP) बदलला आहे. त्यांच्या डीपीमधून काँग्रेस गायब झाला असून त्यांनी भगवं वस्त्र परिधानकेलेला फोटो लावला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप बरोबर टेलेग्रामवरील फोटो देखील बदलला आहे

हार्दिक पटेल (Hardik Patel) म्हणाले आहेत की, ''मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी लढत आहे. मी नाराज जरी असलो, तरीही ही आमच्या कुटुंबातील आतील गोष्ट आहे. माझी तब्येत ठीक होती, मात्र लोकांनी सतत प्रश्न विचारून आता बिघडली आहे. आपल्याला आणखी सामर्थ्यवान व्हावे लागेल.''

अलीकडेच त्यांनी भाजपचे कौतुक केले होते, यावरच विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले आहेत की, मी बायडेन यांचेही कौतुक केले होते. म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो का? पटेल म्हणाले, ''मी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यावर नाराज नाही. मी राज्य नेतृत्वावर नाराज आहे. मी अस्वस्थ आहे, कारण निवडणुका येत आहेत आणि अशा वेळी प्रामाणिक आणि कणखर लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यांना पद द्यायला हवीत.''

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी