मुंबई : मागील दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीसह भारतातील अनेक भागात H3N2 इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झाले असून उपाययोजना लागू करत आहेत. याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात माहिती दिली. तोडांवर रुमाल ठेवणे, हात स्वच्छ धुणे अशा सगळ्या ज्या पूर्वी करतं होतो त्या बाबी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
H3N2 चे राज्यांत रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर याठिकाणी रुग्ण संख्या अधिक आहे. राज्याचा मृत्यूदर 1.8 टक्के आहे. सर्दी, ताप आढळून आल्यास तत्काळ दवाखान्यात जाण्यासाठी आवाहन करत आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 1308 आहे, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे.
यासाठी जास्तीत जास्त चाचण्या वाढवण्यासाठी आम्ही आदेश दिले आहेत. 16 मार्च 2023 रोजी आम्ही विधीमंडळ परिसरात एक अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे आणि सर्व सूचना दिल्या आहेत. बूस्टर डोस देण्याबाबत आदेश दिले आहेत.
सध्या औषधांचा साठा मुबलक प्रमाणात आहे. ऑक्सीजन परिस्थिती चांगली आहे 523 प्लांट आपल्याकडे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. तोडांवर रुमाल ठेवणे, हात स्वच्छ धुणे अशा सगळ्या ज्या पूर्वी करतं होतो त्या बाबी कराव्यात, असे आवाहनही तानाजी सावंत यांनी केले आहे.