महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 5 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली. निकालांवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात सह राज्यात ग्रामपंचायतीवर शिंदे गट व भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या असून ग्राउंड वर केलेले काम व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच शिंदे गटाला यश मिळाल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान काम करणाऱ्यांच्या मागे मतदार उभा राहतो हे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. तर बोदवड तालुक्यात मात्र शिंदे गटाला खाते उघडता न आल्याने ग्रामपंचायतीची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.