राजकारण

...मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात; गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी

Gulabrao patil यांनी उध्दव ठाकरेंवर केली जाहीर टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तरीही शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करणार नाही, असे शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात येत होते. परंतु, याला फाटा देत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उध्दव ठाकरेंवर जाहीर टीका केली आहे.

गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच उध्दव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शेवटी नेत्याने पण कार्यकर्त्यांचं ऐकलं पाहिजे. पण, आमचं उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलं नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

ज्यावेळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, तेव्हा त्यांच्याशी सहज बोलता येत होतं. परंतु, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही कुणाकडे बोलायचं? माझा व्यक्तिगत प्रश्न नव्हता, पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती. त्यामुळे आम्ही वारंवार हे प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, असेही पाटलांनी सांगितले.

आम्ही हेच सांगायला गेलो होतो की, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना परत बोलवा. परंतु, संजय राऊत यांनी हलकट सारखं सांगितलं निघून जा. मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात. आणि उठाव केला, अशी मनातील खदखद गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या राज्यभरात शिवसंवाद यात्रा सुरु आहे. यादरम्यान त्यांनी चूक मानय करा. मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास खुले आहेत, असे आवाहन बंडखोर आमदारांना केले.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...