राजकारण

चारी मुंड्या चित केले नाही तर बापाचं नाव...; गुलाबराव पाटलांचे आव्हान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सध्या शिंदे गटावर आक्रमकपणे टीका करताना पाहायला मिळत आहेत. नुकताच श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राऊतांनी थुंकण्याची कृती केली होती. यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांचा बापच काढला आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात संजय राऊतांवर जहरी टीका केली.

संजय राऊत यांना फक्त मी एकटाच दिसत असून म्हणून ते आता थुंकायाला लागले आहेत. त्यांनी थुंकण्यापेक्षा राजीनामा द्यावा, असा निशाणा गुलाबराव पाटलांनी राऊतांवर साधला आहे. तर 40 लोकांना संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या संजय राऊत यांना त्यांनीच मत देऊन खासदार केले आहे, असे म्हणत मला मत द्यायला संजय राऊत यांचा बाप आला होता का? असा घणाघात गुलाबराव पाटलांनी राऊतांवर केला आहे.

गुलाबराव पाटलांची हवा संपली असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, कार्यकर्ते व तरुण हे माझे चार्जिंग मशीन असून तुमच्या छाताड्यात भगवा झेंडा घालून गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गुलाबराव पाटलाला संपवायला तुमचे बाप जादे जरी खाली उतरले तरी गुलाबराव पाटलांचे प्रेम विकत घेऊ शकणार नाही. तुमच्याकडे नोटा वाटायची ताकद असेल तर आमच्याकडे नोटा हिसकवण्याची धमक असल्याचेही गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे. तर गुलाबराव पाटलांच्या नादी लागू नका, असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

दरम्यान ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी हिंमत असेल तर ठाकरे गटाचे तिकीट घेऊन निवडणुकीत उतरून दाखवावे. त्यांना चारी मुंड्या चित केले नाही तर बापाचं नाव लावणार नाही, असे थेट आवाहन दिले आहे.

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...