Shiv Sena | Gulabrao Patal team lokshahi
राजकारण

गुलाबराव पाटलांना शिवसेनेकडून झटका, 'ती' रुग्णवाहिका घेतली परत

मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे गटातील आमदारांचे शर्थीचे प्रयत्न

Published by : Shubham Tate

Gulabrao Patal : माजी मंत्री आणि शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली होती ही शिंदे गटाकडून परत घेण्यात आली आहे. नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून श्रीकांत फाऊंडेशनच्या सहकार्यातून जिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र आता गुलाबराव पाटील यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ही रुग्णवाहिका शिवसेनेकडून परत घेण्यात आली आहे. (Gulabrao Patal gets hit by Shiv Sena ambulance taken back)

गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांच्याकडूनही त्यांना प्रतित्युर दिले जात आहे.

तर दुसरीकडे दिल्ली दौऱ्याहून परतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात आज शिंदे समर्थक आमदारांची गर्दी पाहायला मिळाली. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार येत्या 3 ते 4 दिवसांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार होईल, अशा चर्चा सुरु आहे. तारखेची घोषणा झाली नसली तरी दिल्ली भेटीत भाजपा पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. अशात शिंदे गटातून किती जणांना मंत्रिमंदाची लॉटरी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी