महाराष्ट्रातल्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत आहे. याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. आता या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे.
तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला आहे. दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितलं आहे. त्यामुळे आता आता या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास तरी उठली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. पण राज्यपालांकडून त्यावर काही निर्णय देण्यात आला नाही. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.