राजकारण

राज्यपाल गडचिरोली दौऱ्यावर

Published by : Lokshahi News

व्यंकटेश दुधामवर;गडचिरोली | महाराष्ट्र गडचिरोली बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गडचिरोलीत दाखल झाले.गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्त असणार आहे.रविवारी शहरात अघोषीत बंद, संचारबंदीसदृष्य स्थिती त्याच बरोबर राज्याचे राज्यपाल पहिल्यांदा नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुक्कामी असणार.

लखीमपुर हत्याकांडाविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गडचिरोली दौरा पोलीस आणि प्रशासनापुढे कायदा, शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मोठे आव्हान ठरणारा आहे.

राज्यपाल सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आगमनानंतर सरळ डॉ. अभय बंग यांच्या "सर्च" या संस्थेत जाणार आहेत. रात्री गडचिरोली मुक्काम असणार असून मंगळवारी सकाळी 9 वाजता सीआरपीएफ च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने आयोजित सायकल रॅलीमध्ये हिरवा झेंडा दाखविणार असून ही रॅली सीआरपीएफ ग्राउंडवरून काढण्यात येणार आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास उपस्थित राहतील. यावेळी राज्यपालांसोबत राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान दीक्षांत समारंभानंतर हर्ष चव्हाण हे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. दोन्ही कार्यक्रमांना गडचिरोलीचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे हे देखील त्याठिकाणी उपस्थित असतील. राज्यपालांच्या या दौऱ्यात कसलीही त्रुटी राहु नये यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. राज्यपाल ज्या मुख्य मार्गाने आवागमन करणार आहेत. त्या मार्गावरील काही अतिक्रमणे काढून टाकली असुन हातावर पोट घेऊन जगणाऱ्या,रस्त्यावरील छोट्या टपरीधारकांना त्यांचे व्यवसाय बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तर खड्डे पडलेले रस्तेही बुजवण्यात आले आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...