राजकारण

Ambadas Danve : 'सरकार कारवाई करण्यात कुचकामी'; कराड प्रकरणावरून अंबादास दानवेंची टीका

आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्याव्यवसाय चालवते असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्याव्यवसाय चालवते असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेंभूतील छत्रछाया वृद्ध व निराधार आश्रमातील धक्कादायक प्रकार आहे. निराधार मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा रेखा सकटवर आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात आश्रमाच्या नावाखाली अशा घटना घडत असतील तर असे आश्रम आणि संस्था तात्काळ बंद केले पाहिजे. सरकारने कारवाई केली पाहिजे. सरकार या बाबतीत कुचकामी दिसतंय अशी कराड प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

हे सगळं दुर्देवी आहे. अशा प्रकारचं जर कोणी करत असेल अशा संस्थेवर त्वरित कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी संस्था बंद केली पाहिजे. या घटना कुठे झाल्या नाही पाहिजे आणि जिथे ह्या घटना घडतात तिथे कारवाई झाली पाहिजे. सरकराचं कुचकामी आहे असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha