नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थिती लावली. परंतु, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) अडवण्यात आले. यावर पवार-पडळकर आमने-सामने आले असून एकमेकांवर टीका करत आहे. गोपीचंद पडळकर यांनी आजही शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, चौंढी येथे रोहित पवार यांनी येण्याचे काम काय, अहिल्यादेवींच्या पुतळा अनावरण करण्यासाठी येण्याचे काम काय, प्रशासनाचा वापर करून आमच्या पवित्र व अस्मिता असलेल्या ठिकाणी पवारांचे काम काय. असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
1955 पासून होळकरांचा किल्ला होळकरवाडा त्यांच्या ताब्यात दिला होता. तो परत द्या, अशी मागणी पडळकारांनी केली. होळकरवाडा पुरातन वास्तू पुरातत्व खात्याकडे देण्यासाठी शरद पवार काहीच करत नाही. भ्रष्टाचार करत आहेत. तर त्याची चौकशी नाही. वय झाले असेल तर त्यांनी घरी बसावे नाहीतर जबाबदारी घ्यावी. तर जे सरकारचे कर्तेधर्ते आहेत. त्यांच्यावर टिका झाली तर वाईट वाटून घेऊ नका, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे.
शरद पवार नावाला नाही तर प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता तुम्हाला घाबरायचे पण आता नाही. पडळकरची मी औलाद आहे म्हणूनच शरद पवारला नडतोय, अशा शब्दांत पडळकरांनी टीकास्क्ष सोडले आहे.