राजकारण

गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; कारण काय?

गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात पहिल्यांदा भटके विमुक्त, आदिवासी, बहुजनांची फौज बांधून इंग्रजांना २२ वेळेस युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव आहे. महाराष्ट्रात श्रीमंत मल्हारराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला शिल्लक आहे. ही पवित्र वास्तू देशातील धनगर व समस्त बहुजन आठरापगड बांधवांचे श्रद्धास्थान आहे.

बहुजनांच्या पराक्रमी इतिहासाची प्रस्थापितांच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सत्तेत कायम हेळसांड झाली. आता मात्र वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व तिथे होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन व जतन करावे यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार मागणी केली आहे. सध्या महायुती सरकारच्या काळात काही सकारात्मक बाबी होत आहेत. पण सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे, असे असताना किल्ले वाफगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून १० कोटीचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पथ्यावरच हा निधी पडेल याची भिती धनगर बांधवांना आहे.

कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मुळ मागणीला खोडा घालणारा आहे. हे सरकारने कृपया लक्षात घ्यावे. त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडाचा स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे, त्याच धर्तीवर आपण किल्ले वाफगावचा विकास करावा. किल्ले वाफगाव विकास प्राधिकरण स्थापन करावे, समग्र विकास आराखडा सादर करावा. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा शेकडो कोटींचा निधी देण्यात यावा, याची घोषणा करून येत्या ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा ही विनंती. सरकारला शक्य नसल्यास आम्हा धनगर बहुजन बांधवांस परवानगी द्यावी की आम्ही स्वतः आमच्या राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावचा भव्यदिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू. जय मल्हार! असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी